मुंबई गोवा महामार्गावर शिवशाही आणि ट्रकचा भीषण अपघात, सात प्रवासी जखमी

मुंबई गोवा महामार्गावर  शिवशाही आणि एका ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार माणगाव नजीक कलमजे जवळ शिवशाही बस आणि सीएनजी ट्रकचा भीषण अपघात झाला. या
अपघातात सात प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प झाली असून मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रागा लागल्या आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हा अपघात नेमका कसा घडला याची माहिती अद्याप कळालेली नाही.

Comments are closed.