Wedding Gifts: लग्नात वधू- वराला द्या हे भन्नाट गिफ्ट्स; आयुष्यभर राहील त्यांच्या लक्षात

सध्या लग्नसराई सुरू आहे. लग्नाला जाताना आपण रिकाम्या हातांनी न जाता आहेर, पाकीट किंवा भेटवस्तू घेऊन जात असतो. तुम्हीही लग्नाला हजेरी लावणार असाल तर गिफ्ट काय द्यावं हा प्रश्न पडत असेल. बहुतांश वेळा लग्नात वधू- वराला पाकीट दिले जाते. मात्र त्याऐवजी तुम्ही काही भन्नाट गिफ्ट्स देऊ शकता. हे असे काही गिफ्ट्स आहेत जे बजेटमध्ये येतात आणि कायम आठवणीत राहतील. ( Unique Gifts Options For Newly Wed Couple )

कस्टमाइज्ड दागिने
आजकाल कस्टमाइज्ड दागिने खूप लोकप्रिय आहेत. तुम्ही नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या लग्नाच्या दिवशी कस्टमाइज्ड दागिने भेट देऊ शकता. तुम्ही वधू-वरांची नावे आणि लग्नाची तारीख त्यावर डिझाईन करून घेऊ शकताता. हे तुमच्या बजेटमध्ये येणारे सर्वात चांगलं गिफ्ट ऑप्शन आहे.

फोटो फ्रेम्स
फोटो फ्रेम्स हे एक कॉमन गिफ्टचा पर्याय आहे. तुम्ही कस्टमाइज्ड फोटो फ्रेम गिफ्ट करू शकता जी बेडरूममध्ये लावता येते. याशिवाय कपल्ससाठी कस्टमाइज्ड टॉवेल आणि शॉवर कोट सेट देऊ शकता. त्यांच्यासाठी ही एक अनोखी आणि संस्मरणीय भेट ठरू शकते.

स्वयंपाकघरातील उपकरणे
लग्नानंतर स्वयंपाकघरातील उपकरणे ही लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही जोडप्याला ब्लेंडर, चॉपर, कॉफी मेकर, इंडक्शन कुकर, ओटीजी किंवा टोस्टर, इलेक्ट्रिक कुकर किंवा स्टेनलेस स्टील कुकवेअर सारखी उपकरणे भेट देऊ शकता. ते खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील किंमतींची तुलना करा.

शोपीस
तुम्ही वधू-वरांना त्यांच्या लग्नात शोपीस देखील भेट देऊ शकता. हे खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. तुम्ही अँटीक ग्रामोफोन, सुवासिक मेणबत्त्या, इनडोअर प्लांट्स, हँडमेट पेंटिंग्स अशा काही सजावटीच्या वस्तू तुम्ही गिफ्ट करू शकता.

कपल घड्याळे
वधू-वरांसाठी कपल घड्याळ ही एक उत्तम भेट ठरते. ते दैनंदिन वापरासाठी उपयुक्त आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार ते खरेदी करू शकता. याशिवाय त्यांना आवडत्या ब्रँडचा चष्मा, बेल्ट किंवा पर्स देऊ शकता.

Comments are closed.