आता पाकिस्तानही टीम इंडियाच्या पुढे, WTC पॉइंट्स टेबलमध्ये उलथापालथ, लज्जास्पद क्रमांकावर पोहोच


WTC 2025-27 पॉइंट्स टेबल अपडेट : टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेने भारतात येऊन इतिहास रचला आहे. तब्बल 25 वर्षांपासून भारतात कसोटी मालिका जिंकण्याची प्रतीक्षा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला अखेर गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत मोठा विजय मिळाला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा केवळ 140 धावांत आटोपला आणि 408 धावांनी विक्रमी विजय नोंदवला. यासह दोन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकत त्यांनी भारतात क्लीन स्वीप केला. हा कसोटी क्रिकेटमधला भारताचा सर्वात मोठा धावांनी झालेली पराभव आहे. तसेच 2000 नंतर प्रथमच दक्षिण आफ्रिकेने भारतात कसोटी मालिका जिंकली आहे.

WTC गुण सारणी 2025-27 अद्यतनित केली SA ने इंड.ला हरवल्यानंतर

भारतातील पराभवामुळे WTC पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तानला मोठा फायदा झाला. दुसरी कसोटी हरल्यानंतर भारताची पॉइंट्स टक्केवारी 48.14 वर घसरली आहे, ज्यामुळे पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. याआधी पाकिस्तान पाचव्या स्थानावर होता. भारतीय संघ आता पाचव्या स्थानावर घसरला आहे. गुवाहाटी कसोटी जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची विजय टक्केवारी 75 झाला असून तो दुसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलिया 4 पैकी 4 सामने जिंकून अद्याप अव्वल स्थानावर कायम आहे.

भारत WTCच्या अंतिम फेरीत कसा पोहोचू शकतो? (How can India reach finals of WTC 2025-27)

या पराभवानंतरही भारताची WTC 2025-27 च्या अंतिम फेरीत जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या चक्रात भारताचे अजून 9 सामने बाकी आहेत. अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट करण्यासाठी भारताने उर्वरित 9 पैकी किमान 8 सामने जिंकणे अत्यावश्यक आहे. असे झाल्यास भारताची पॉइंट्स टक्केवारी 70 च्या वर जाईल आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळण्याची शक्यता असेल.

भारताला आता दोन परदेशी कसोटी मालिकादेखील खेळायच्या आहेत. मागील तीन WTC हंगामांकडे पाहिल्यास अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या संघांची सरासरी पॉइंट्स टक्केवारी 64 ते 68 दरम्यान राहिली आहे. त्यामुळे भारताने अंतिम फेरीत जायचं असेल, तर उर्वरित 9 पैकी 8 सामन्यांत विजय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील.

हे ही वाचा –

Ind vs SA 2nd Test Gautam Gambhir: दक्षिण आफ्रिकेनं मालिका 2-0 नं जिंकली; भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव, गौतम गंभीर राजीनामा देण्याच्या तयारीत?

आणखी वाचा

Comments are closed.