Protein Sources : अंडी, चिकन की पनीर; कशात आहे जास्त प्रोटीन?
प्रोटीन शरीराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. स्नायू, केस, हार्मोन्स आणि एन्झाइम्सची रचना योग्य राखण्यासाठी प्रोटीन आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. प्रोटिनची कमतरता पूर्ण करण्यासाठी बरेच जण अंडी, चिकन खातात. जे वेजिटेरियन आहेत ते पनीर खातात. कारण अंडी, पनीर आणि चिकन हे प्रोटिनचे उत्कृष्ट स्त्रोत मानले जातात. पण अंडी, पनीर आणि चिकनमधील सर्वात जास्त प्रोटीन असलेला पदार्थ कोणता? तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. चला जाणून घेऊयात याचे उत्तर
चिकन –
चिकनचा विचार केल्यास 100 ग्रॅम चिकनमध्ये सुमारे 165 कॅलरी असते. 30 ग्रॅमच्या आसपास प्रोटीन तर 3.5 ग्रॅम फॅट असते.
अंडी –
हेही वाचा – फेड सेफ्टी टिप्स: 'या' भाजीपाला हॉट क्राफ्ट आहे तर हॉस्पिटलला तोंड द्यावे लागते
प्रोटिनसाठी अंड्यात हाय क्लॉलिटीचे प्रोटीन असते. तज्ज्ञमंडळी याला Gold Standard Protein म्हणतात. प्रोटिनचा विचार केल्यास 100 ग्रॅम अंड्यात सुमारे 155 कॅलरी, 13 ग्रॅम प्रोटीन, 1.1 ग्रॅम कार्ब्स असतात. याशिवाय अंड्यात व्हिटॅमिन D, B 12 असते.
चीज –
100 ग्रॅम पनीरमध्ये जवळपास 300 ग्रॅम कॅलरी असते. यात 18 ग्रॅम प्रोटीन, 20-21 फॅट आणि 1-2 ग्रॅम्स कार्ब्स असतात. पनीर खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. याशिवाय पनीरमध्ये हेल्दी फॅट्स आणि कॅल्शियम असतात.
तिघांपैकी काय उत्तम ?
जर तुम्ही वेजिटेरियन असाल तर पनीर तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. तुम्हाला बराच काळ पोट भरलेले हवे असेल तर पनीरचे सेवन करू शकता. तुम्ही जिमला जाणारे असाल किंवा वयस्क व्यक्तींसाठी अंडी उत्तम पर्याय आहे. अंड्यात हाय क्वालीटीचे प्रोटीन असते. तुम्हाला हाय प्रोटीन्स, कमी कॅलरी आहार हवा असल्यास चिकन खावे. तज्ज्ञांच्या मते अंडी, चिकन आणि पनीरचे स्वत:चे वेगळे फायदे आहेत. गरजेनुसार याचा आहारात सेवन करायला हवे.
हेही वाचा – Detox Water: लिंबू, जिरे, बडीशेप की तुळशीच्या पानांचं पाणी; सकाळी रिकाम्या पोटी काय घेणं जास्त चांगलं?
Comments are closed.