रोहित शर्मा न खेळताही ठरला नंबर- 1 खेळाडू! न्यूझीलंडच्या स्टारला मागे टाकत पुन्हा पटकावले अव्वल स्थान

रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत दीर्घ विश्रांतीनंतर टीम इंडियाच्या जर्सीत पुनरागमन केले होते. या मालिकेत त्याने शानदार कामगिरी केली आणि 3 सामन्यांत 202 धावा केल्या. या काळात त्याच्या नावावर एक अर्धशतक आणि एक शतक नोंदले गेले. त्याच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर तो ICC वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 झाला होता.

न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेलने (Darrel Mitchell) काही काळासाठी रोहितला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं होतं. मात्र आता रोहितने एकही सामना न खेळता मिचेलला पुन्हा मागे टाकले आहे आणि वनडे रँकिंगमध्ये परत नंबर 1 झाला आहे.

अलीकडेच ICC ने वनडे रँकिंग अपडेट केली आहे. यामध्ये दुसऱ्या स्थानावर असलेला रोहित शर्मा आता पहिल्या स्थानावर आला आहे. डॅरेल मिचेल दुखापतीमुळे वेस्ट इंडीजविरुद्धची वनडे मालिका खेळू शकला नाही, त्यामुळे त्याची रँकिंग खाली आली. रोहित शर्मा आता 781 रेटिंग पॉइंट्ससह नंबर 1 आहे, तर मिचेल 766 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टॉप 10 यादीत चार भारतीय फलंदाज आहेत. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर.

वनडे रँकिंग टॉप 10:

रोहित शर्मा – भारत – ७८१

डॅरेल मिचेल – न्यूझीलंड – 766

इब्राहिम जद्रान – अफगाणिस्तान – 764

शुभमन गिल – भारत – ७४५

विराट कोहली – भारत – ७२५

बाबर आझम – पाकिस्तान – 722

हॅरी टेक्टर – आयर्लंड – 708

शे होप – वेस्ट इंडिज – ७०१

श्रेयस अय्यर – भारत – ७००

चरिथ असलांका – श्रीलंका – 690

भारत आणि दक्षिण अफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी मालिका संपली आहे. आता दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. 30 नोव्हेंबर 2025 पासून रांची येथे ही मालिका सुरू होईल. या मालिकेत रोहित शर्मा पुन्हा मैदानात उतरणार आहे. विराट कोहलीही (Virat Kohli) मालिकेच्या तयारीसाठी रांचीला पोहोचले आहे आणि लवकरच रोहितही तिथे पोहोचेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत जसा रोहितने जबरदस्त खेळ केला, तसाच खेळ दक्षिण अफ्रिकेविरुद्धही पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

Comments are closed.