Jalna News वेश्या व्यवसाय चालणाऱ्या हॉटेलवर पोलिसांचा छापा, चार जणांना अटक; तीन पीडीत महिलांची सुटका

जालना ते मंठा जाणाऱ्या रोडवर रामनगर साखर कारखाना येथील साईच्छा हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. या हॉटेलवर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या चार पुरुषांना अटक करण्यात आली असून तीन पीडीत महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी रात्री करण्यात आली आहे.
जालना ते मंठा रोडवरील रामनगर साखर कारखाना येथील साईच्छा हॉटेलचे मालक सुधाकर यादव हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्या हॉटेलवरील लॉजमधे बाहेरुन महिलांना आणुन त्यांच्याकडुन वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्या हॉटेलवर छापा मापला. यावेळी हॉटेलवर मालक सुधाकर यादव, मॅनेजर इश्वर बबनराव गायकवाड, पंडीत काळु, अक्षय एकनाथ बुरकुल यांना अटक केली. व तीन पीडित महिलांची सुटका केली. घटनास्थळावरून पोलिसांनी रोख ४० हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Comments are closed.