अवैध गर्भलिंग निदान करणारे रॅकेट उघडकीस, जालना पोलिसांची मोठी कारवाई, गुन्हा दाखल


जालना क्राईम न्यूज : जालना (Jalna) जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागाला मिळालेल्या माहितीनुसार गावातील एका पत्र्याच्या शेडमध्ये गर्भलिंग निदानाचा अवैध व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे.

दोन मुख्य आरोपीसह इतर सहा जणांवर भोकरदन पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीच्या आधारे संयुक्त पथकाने छापा टाकून केशव गावंडे आणि सतीश सोनवणे या दोघांना अटक केली. यापैकी एक आरोपी पॅथॉलॉजिस्ट असल्याचे समोर आले आहे. छाप्यातून पेनाच्या आकाराचे गर्भलिंग निदान करणारे मशीन जप्त करण्यात आले असून, हे उपकरण मोबाईल ॲपच्या माध्यमातून ऑपरेट केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन आरोपींबरोबरच त्या ठिकाणी तीन पुरुष आणि तीन महिला आढळून आल्या. या प्रकरणी दोन मुख्य आरोपीसह इतर सहा जणांवर भोकरदन पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती मिळाल्यानंतर लगेच पोलीस घटनास्थवी दाखल झाले होते. यानंतर गावातील एका पत्र्याच्या शेडमध्ये गर्भलिंग निदानाचा अवैध व्यवसाय सुरु असल्याचे पोलिसांना आठळून आले. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पैसे दुप्पट करण्याचे अमिष, लाखो रुपयांची फसवणूक, मुंबईत लूट करणाऱ्या टोळीला अटक

मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी शेअर मार्केटमध्ये पैसा दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून मुंबईकरांची लूट करणारी टोळीला अटक केली आहे. या टोळीकडून जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा परिसरात राहणारा एका व्यक्तीला ट्रेडिंग च्या नावाने 5 लाख 72 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. फिर्यादी राजू छिब्बेर यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, पैसा डबल करून देतो असे सांगून रक्कम उकळली होती. तांत्रिक तपासात संशयितांचे लोकेशन धारावी परिसरात आढळल्याने पोलिसांनी मोहम्मद अकील शेख याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या माहितीवरून विजयकुमार पटेल, राजेंद्र विधाते आणि अक्षय कणसे यांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपी वेगवेगळ्या नावाने बोगस बँक खाती उघडून त्याद्वारे फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे. अटक केलेल्या चौघांना न्यायालयाने 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या:

शेअर मार्केटमधून पैसे दुप्पट करुन देण्याचे अमिष, लाखो रुपयांची फसवणूक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

आणखी वाचा

Comments are closed.