शेअर बाजारात जोरदार उडी
सेन्सेक्स हजार अंकांनी तेजीत
► मुंबई:
बुधवारी भारतीय बाजारात विविध कारणांमुळे मोठी उसळी पहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 1,023 अंकांनी वधारत 85,610 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 321 अंकांनी तेजीसह 25,205 स्तरावर बंद झाला. याच दरम्यान गुंतवणूकदारांच्या खात्यामध्ये 6 लाख कोटींची भर पडलेली दिसून आली.
सर्व क्षेत्रांचे निर्देशांक तेजीसमवेत बंद झाले. बँक निफ्टी निर्देशांक सर्वोच्च स्तरावर बंद झाला होता. देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक चालू ठेवल्याने त्याचा परिणाम सकारात्मक पहायला मिळाला. युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धाबाबत ट्रम्प यांचे सकारात्मक विधान, येत्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीत रेपोदर कपातीची आशा या तीन महत्त्वाच्या कारणांमुळे शेअरबाजारात बुधवारी मोठी तेजी दिसून आली.
Comments are closed.