भाजपचा उमेदवार निवडा, 10 लाख मिळवा
केंद्रीय मंत्र्यांचे गावांना आश्वासन
हैदराबाद
केंद्रीय मंत्री तसेच करीमनगरचे खासदार बंदी संजय कुमार यांनी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये स्वत:च्या मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये भाजपचे समर्थनप्राप्त उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी भाजपचे समर्थनप्राप्त उमेदवारांना विजयी करणाऱ्या गावांना 10 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. करीमनगरमधील गावांनी भाजपचे समर्थनप्राप्त उमेदवारांना सर्वसंमतीने विजयी करावे आणि विकासासाठी त्वरित 10 लाख रुपये मिळवावे. करीमनगर मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या गावाने भाजपशी संबंधित सरपंच निवडल्यास मी त्या गावाच्या विकासासाठी कुठल्याही विलंबाशिवाय आणि कारण न देता थेट 10 लाख रुपये देणार आहे. खासदार म्हणून माझ्याकडे खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या अंतर्गत निधी उपलब्ध आहे. लोकांनी बीआरएस आणि काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नये. केवळ भाजपच निधी देणार आहे. चुकून विरोधी पक्षांचे उमेदवार विजयी झाल्यास नवा निधी मिळणार नाही आणि केंद्रीय निधीही विभागला जाऊ शकतो, असा इशारा बंदी संजय कुमार यांनी दिला आहे.
Comments are closed.