आता भारत आणि द. अफ्रिकेत रंगणार वनडे अन् टी-20 चा थरार, रोहित-विराट रांचीत पोहोचले, पाहा संपूर्
भारत विरुद्ध एसए वनडे वेळापत्रक रोहित शर्मा-विराट कोहली: दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण अफ्रिकेने भारताचा 2-0 अशा फरकाने पराभव (India vs South Africa 2nd Test) केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात (Ind vs SA 2nd Test) दक्षिण आफ्रिकेनं भारताला 408 धावांनी पराभूत केलं. 549 धावांचं आव्हान गाठताना भारत 140 धावांतच गारद झाला.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका संपल्यानंतर आता भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात वनडे आणि टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. 30 नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्या वनडे मालिका रंगणार (Ind vs SA ODI Schedule) आहे. यासाठी काल रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) रांची येथे दाखल झाले आहेत. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका असेल तर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येईल. शुभमन गिलला (Shubhman Gill) दुखापत झाल्यामुळे केएल राहुल टीम इंडियाच्या (Team India) वनडे संघाचं नेतृत्व सांभाळेल.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संपूर्ण संघ- (Team India Squad Against SA)
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा,कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.
🚨 बातम्या 🚨#TeamIndiaसाठीचे पथक @IDFCFIRSTBank दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जाहीर.
अधिक तपशील ▶️https://t.co/0ETGclxAdL#INDvSA pic.twitter.com/3cXnesNiQ5
— BCCI (@BCCI) 23 नोव्हेंबर 2025
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला विश्रांती- (Ind vs SA ODI Schedule)
वनडे मालिकेत वेगवान गोलंदाज म्हणून निवड समितीनं युवा खेळाडूंना संधी दिली आहे. अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी देण्यात आली आहे. तर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह खेळताना दिसले.
भारतविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ- (South Africa Squad Against Team India)
टेम्बा बावुमा (कर्ंधर), ओटनिएल बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रेत्झके, डेवाल्ड ब्रेविस, नँद्रे बर्जर, क्विंटन डी कॉक, टोनी डी जोर्झी, रुबिन हरमन, केशव महाराज, मार्को जॅनसेन, एडन मार्कराम, लुंगी एनगिडी, रायन सुबरेन, प्रिलटन.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.