आता 9 सामने शिल्लक, टीम इंडियाला WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी समीकरण काय?
WTC फायनल 2027 साठी भारत कसा पात्र ठरू शकतो: गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 408 धावांनी मोठा पराभव केला. 549 धावांचं आव्हान गाठताना भारत 140 धावांतच गारद झाला. धावांचा विचार करता भारताचा आजवरचा सर्वात मोठा पराभव आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेनं तब्बल 25 वर्षांनंतर भारतात (Team India) कसोटी मालिका जिंकली. या पराभवामुळे टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये घसरण झाली. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा (WTC Final 2027) मार्गही कठीण झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता नेमकं समीकरण काय असणार?, याबाबत जाणून घ्या…
गुवाहाटी कसोटीपूर्वी, 2025-2027 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत चौथ्या स्थानावर होता, परंतु दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारत आता पाचव्या स्थानावर घसरला आहे. भारताच्या पराभवाचा फायदा पाकिस्तानला झाला आहे, जो पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे. पाकिस्तानने खेळलेल्या दोन कसोटींपैकी एक जिंकला आहे आणि एक गमावला आहे. भारताने आतापर्यंत नऊ सामने खेळले आहेत, त्यापैकी चार जिंकले आहेत आणि तर चार सामन्यात पराभव झाला आहे. एक कसोटी अनिर्णित राहिली. भारताची विजयाची टक्केवारी 48.15 आहे. (How India Can Qualify For WTC Final 2027)
टीम इंडियाला WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी समीकरण काय? (How India Can Qualify For WTC Final 2027)
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-2027 स्पर्धेत आता भारतीय संघाचे अजूनही नऊ सामने शिल्लक आहेत. भारताला नऊ पैकी आठ सामने जिंकावे लागतील, ज्यामुळे त्यांचा विजयाचा टक्का 70 च्या वर जाईल. नऊ पैकी सात कसोटी जिंकल्यावरही अंतिम फेरीत पोहोचण्याच्या टीम इंडियाच्या आशा जिवंत राहतील. तथापि, भारताला सामना अनिर्णितही ठेवता येणार नाही. पुढील सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील.
– 2 कसोटी विरुद्ध श्रीलंका.
– न्यूझीलंड विरुद्ध २ कसोटी.
– ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 कसोटी.WTC अंतिम पात्रतेसाठी भारताला 9 सामन्यांतून किमान 7 विजय आवश्यक आहेत. 🇮🇳 pic.twitter.com/SwrhJ2lygP
– जॉन्स. (@CricCrazyJohns) २६ नोव्हेंबर २०२५
टीम इंडियाच्या पुढील कसोटी मालिकेचे वेळापत्रक- (Team India Upcoming Test Series)
भारत विरुद्ध श्रीलंका- 2 कसोटी सामने
भारत विरुद्ध न्यूझीलंड- 2 कसोटी सामने
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- 5 कसोटी सामने
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.