स्मृती मानधनाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर जिवलग मैत्रीण जेमिमा रॉड्रिग्जचा मोठा निर्णय! नेमकं काय घ


ते कसे करायचे ते तुम्ही शिकू शकता. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) 23 नोव्हेंबर रोजी पलाश मुच्छलसोबत (Palash Muchhal) विवाहबंधनात अडकणार होती. या लग्नासाठी टीम इंडियाच्या (Indian Players) अनेक महिला क्रिकेटपटू स्मृतीच्या घरी पोहोचल्या होत्या, त्यात जेमिमा रॉड्रिग्सचंही (Jemimah Rodrigues) नाव होतं. मात्र लग्नाच्या आदल्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांची अचानक तब्येत बिघडल्याने हा समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी आणि चिंता स्पष्ट दिसत होती. स्मृतीची जिवलग मैत्रीण असलेल्या जेमिमानेही या कठीण वेळी तिच्या सोबत राहण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. (Smriti Mandhana Wedding With Palash Muchhal on hold)

जेमिमा रॉड्रिग्जने WBBL मधून घेतली माघार

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला बिग बॅश लीगच्या सध्याच्या हंगामात जेमिमा रॉड्रिग्स ब्रिस्बेन हीट संघाचा भाग होती. महिला वनडे विश्वचषक 2025 संपल्यानंतर ती या लीगसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाली होती. स्मृतीच्या लग्नासाठी भारतात आल्यानंतर जेमिमाला पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाण्याची तयारी होती. पण येथे येताच अचानक परिस्थिती बदलल्याने तिने स्मृतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. यासाठी जेमिमाने ब्रिस्बेन हीट व्यवस्थापनाला विनंती केली की उरलेल्या चार सामन्यांसाठी तिला परत बोलावू नये, आणि फ्रँचायझीने तिची विनंती मान्य केली.

ब्रिस्बेन हीटचे अधिकृत विधान

जेमिमा रॉड्रिग्सबाबत ब्रिस्बेन हीटचे सीईओने निवेदन जारी करत सांगितले की, स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे जेमिमाने या कठीण काळात तिच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ती WBBL 2025 च्या उरलेल्या सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही. जेमिमाची विनंती आम्ही मान्य केली असून ती आता भारतातच राहणार आहे. आम्ही स्मृतीच्या वडिलांच्या लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबाला भविष्याकरिता शुभेच्छा देतो.

हे ही वाचा –

ICC Pitch Rallings : ICC चान अंदाजे 'चाटलीलीलीली हाती 'चाटली' आहे, पण नक्की 'खरब' आहे का, उत्साहित आहे का?

आणखी वाचा

Comments are closed.