गौतम गंभीरला सुनील गावसकरांचा खंबीर पाठिंबा; टीकाकारांना फैलावर घेत विचारले खणखणीत प्रश्न

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका पराभव झाल्यापासून टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गौतम गंभीर सध्या टीकाकारांच्या केंद्रस्थानी असून त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. तसेच मुख्य प्रशिक्षकपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गौतम गंभीर यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत असताना सुनील गावसकयांनी टीकाकारांना फैलावर घेत त्यांची बोलती बंद केली आहे.

टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी INDIA Today शी बोलताना गौतम गंभीर यांच्या बाजूने बोलत टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे. ते म्हणाले की, “तो एक प्रशिक्षक आहे. प्रशिक्षक संघ तयार करू शकतो. प्रशिक्षकाला त्याच्या अनुभवाचा खेळाडू ओळखता येतो. पण खेळाडूंनी कामगिरी करायची असते. जे त्याला (गौतम गंभीर) आता जबाबदार धरत आहेत. त्यांना माझा उलट प्रश्न आहे. जेव्हा भारताने त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तेव्हा तुम्ही काय केले? जेव्हा भारताने त्याच्या नेतृत्वाखाली आशिया कप जिंकला, तेव्हा तुम्ही काय केले?” असे खणखणीत प्रश्न सुनील गावसकरांनी विचारले आहेत.

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार नाही; BCCI ने टीकाकारांना फटकारलं

ते पुढे म्हणाले की, “तुम्ही तेव्हा (विजेतेपद पटाकावले तेव्हा) त्याला वनडे आणि टी-20 क्रिकेटसाठी आजीवन करार वाढवावा? असे म्हटले नाही. तुम्ही आता काढून टाकण्याची मागणी करत आहात. जेव्हा एखादा संघ चांगला खेळत नाही, तेव्हाच तुम्ही प्रशिक्षकाकडे बोट दाखवता.” असा टोला सुनील गावसकरांनी लगावला आहे.

आपण एकमेकांवर विश्वास ठेवू, एकमेकांसाठी लढू…, टीम इंडियाच्या पराभवावर कर्णधार शुभमन गिलची प्रतिक्रिया

तुम्ही त्याला श्रेय द्यायला तयार नाही. जर तुम्ही त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप विजयाचे श्रेय द्यायला तयार नसाल, तर तुम्ही त्याला आता दोष का देऊ इच्छिता?, असा सवाल सुनीनल गावसकरांनी उपस्थित केला आहे.

Comments are closed.