ICC WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी टीम इंडियाला नेमके किती विजय हवे? पुनरागमनासाठी तयार करावा लागणार मास्टरप्लॅन

कोलकाता कसोटीनंतर गुवाहाटी कसोटीमध्येही भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला (Test series IND vs SA). यामुळेच टीम इंडिया (Team india) आता पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर घसरली आहे. त्यामुळे टीम इंडिया साठी WTC फायनलचा मार्ग खूप कठीण झाला आहे.

भारताकडे आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 9 कसोटी सामने बाकी आहेत आणि त्यात त्यांना उत्कृष्ट प्रदर्शन करत स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. सध्या चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, या 9 सामन्यांपैकी किती सामने जिंकल्यावर भारत फायनलमध्ये पोहोचू शकतो?

कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir यांच्यावर सध्या जबरदस्त दडपण आहे. उरलेल्या 9 कसोटीपैकी 4 सामने भारताला परदेशात आणि 5 सामने घरच्या मैदानावर खेळायचे आहेत. भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरी 5 सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर श्रीलंकेच्या मैदानावर 2 कसोटी आणि न्यूझीलंडमध्येही 2 कसोटी सामने खेळायचे आहेत.
या 9 कसोटी सामन्यांपैकी टीम इंडियाला किमान 7 सामने जिंकणे आवश्यक आहे.

Comments are closed.