भडगावमध्ये दोन नंबरवाल्यांना सत्ता देऊ नका, महाजनांची नाव न घेता शिंदे गटाच्या आमदारावर टीका
गिरीश महाजन जळगाव जळगाव जिल्ह्यातील भडगाव नगरपालिकेच्या जाहीर प्रचार सभेत मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांचा चांगालाच समाचार घेतला. भडगावमध्ये ‘दोन नंबरवाल्यांना सत्ता देऊ नका, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांची नाव न घेतला शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका केली. भडगावची परिस्थिती जिल्ह्यात सर्वात खराब आहे. विरोधकांनी “दोन नंबरवाल्या” उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोपही मजान यांनी केलाय. विकासकामांपासून भडगाव मागे पडल्याचे ते म्हणाले.
विरोधकांनी पैसेवाले, दारू-मटन वाटणारे आणि दोन नंबरच्या धंद्याशी संबंधित लोकांना उमेदवारी दिली
जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि नगरपरिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यासह विरोधकांवर जोरदार टीका केली. भडगावची परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यातील नगरपरिषदांपेक्षा सर्वात खराब असून शहरात “दोन नंबरचे धंदेवाले” पुढे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. महाजन म्हणाले की, विरोधकांनी पैसेवाले, दारू-मटन वाटणारे आणि दोन नंबरच्या धंद्याशी संबंधित लोकांना उमेदवारी दिली आहे. अशा लोकांच्या हाती शहराचे नेतृत्व देणे धोक्याचे असल्याचे महाजन म्हणाले.
भडगावमध्ये टक्केवारीचे व्यवहार आणि अकार्यक्षमता सुरू
जामनेर-चाळीसगावमध्ये मोठी विकासकामे होत असतानाही भडगावमध्ये टक्केवारीचे व्यवहार आणि अकार्यक्षमता सुरू असल्याचेही ते म्हणाले. शहराचा निर्णय आता जनतेने बदलाच्या दिशेने घ्यावा, असे आवाहन त्यांनी सभेच्या शेवटी करत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पत्रक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव नगरपालिकेत देखील भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असाच सामना होत आहे. त्यामुळं या ठिकाणी महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहयाल मिळत आहे. दोन्ही पक्षाचे नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांची निवडणूक सुरु आहे. यासाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी सर्व ठिकाणच्या नाकालाची प्रक्रिया पार पडणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.