पाकिस्तानचा कंट्रोल मुनीरच्या हाती! घटनादुरुस्ती करून CDF पदी करण्यात आली नियुक्ती

पाकिस्तानमधील लष्कराचा प्रभाव एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे. देशाचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर याची गुरुवारी पाकिस्तानचे पहिले संरक्षण दल प्रमुख (CDF) म्हणून नियुक्ती करण्यात केली आहे. हे पद अलिकडेच लागू झालेल्या २७ व्या घटनादुरुस्ती अंतर्गत निर्माण करण्यात आले आहे.
या दुरुस्तीनंतर मुनीर आता लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांचा सर्वोच्च कमांडर बनला आहे. त्याचा कार्यकाळ देखील पाच वर्षांचा निश्चित करण्यात आला आहे. या दुरुस्तीनंतर जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे (CJCSC) अध्यक्ष हे पद रद्द करण्यात आले.
दरम्यान, आता अण्वस्त्रांचे नियंत्रण देखील थेट सीडीएफ असीम मुनीर याच्याकडे असेल. पूर्वी हे अधिकार राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळाकडे होते, परंतु आता मुनीर याला सर्वोच्च नियंत्रण देण्यात आले आहे. या बदलामुळे मुनीर याचा कार्यकाळही वाढला. तो मूळतः २७ नोव्हेंबर २०२७ रोजी निवृत्त होणार होता. परंतु आता तो २०३० पर्यंत त्याच्या नवीन पदावर राहतील.

Comments are closed.