Onion Juice : केसांच्या अनेक समस्यांवर उपाय आहे कांद्याचा रस

भाजीची फोडणी कांद्याशिवाय अपूर्ण आहे. कांद्यामुळे पदार्थाला एक प्रकारचे टेक्चर येते. कांदा जसा जेवणाची चव दुप्पट करतो त्याचप्रमाणे कांदा केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कांद्यातील ऍटी-फंगल, ऍटी-बॅक्टेरियल आणि ऍटी ऑक्सिडंट्स गुणधर्म केसांच्या अनेक समस्यावर रामबाण उपाय आहेत. कांद्याच्या रसाने केसगळती थांबते, केसांची चमक वाढते आणि टाळूही मजबूत होते. आज आपण जाणून घेऊयात केसांच्या विविध समस्यांवर कांद्याचा रस कसा वापरायचा.

रसाचे फायदे –

  • ऑलिव्ह ऑईलमध्ये कांद्याचा रस मिसळून केसांच्या मुळांना लावल्याने किंवा मसाज केल्याने केस मजबूत होतात.
  • कांद्याच्या रसाने थेट टाळूवर मसाज करावा. टाळूवर 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवा. केसांतील कांद्याचा वास दूर करण्यासाठी सौम्य शॅम्पूने केस धुवावेत. या उपायाने पांढऱ्या केसांची समस्या कमी होईल.
  • कांद्यातील गुणधर्म केसांतील कोंडा दूर करतात. यासाठी तुम्ही 2 चमचे मेथीचे दाणे बारीक करून रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी याची घट्ट पेस्ट बनवावी. तयार पेस्ट कांद्याच्या रसात मिक्स करून पाण्याने केस धुवा. हा उपाय नियमित केल्यास कोंडा काहीच दिवसात नाहीसा होईल.
कांद्याचा रस
  • कांद्यातील ऍटी-बॅक्टेरियल गुणधर्म केस गळती रोखतात. यासाठी कांद्यात बदामाचे तेल मिसळा आणि टाळूला मसाज करा.

केसांमधून कांद्याचा वास दूर करण्यासाठी उपाय –

  • केसांना कांद्याचा रस लावण्यापूर्वी त्यात काही थेंब लिंबाचे मिक्स करावेत.
  • जर शॅम्पूने केस धुणार असाल तर लिंबाच्या रसाचे थेंब त्यात मिक्स करा आणि त्या शॅम्पूने केस धुवा.
  • केसांच्या मास्क किंवा शॅम्पूमध्ये तेलाचे काही थेंब तुम्ही टाकू शकता. यामुळे कांद्याचा वास येणार नाही.

हेही वाचा – Cinnamon : छोट्याशा दालचिनीने आणा चेहऱ्यावर ग्लो

Comments are closed.