खासदाराचं पोट दुखतय, तुतारी वाजवणं हे त्यांचं काम, धनंजय मुंडेंचा बजरंग सोनावणेंवर हल्लाबोल


धनंजय मुंडे: विधानसभा निवडणुकीनंतर मला इथं सभा घ्यायची गरज पडेल असं वाटलं नव्हतं, इतकं प्रेम तुम्ही दिलं. मी 7 जन्म घेतले तरी तुमचं कर्ज फेडू शकणार नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. लोकसभा निवडणुका वेगळ्या झाल्या. धनंजय मुंडेंनी कधीच जाती पातीचे राजकारण केले नाही. माझ्याकडे आलेले प्रत्येकाचे काम मी केले. म्हणून माझी आठवण येते हे माझे नशीब आहे असे मुंडे म्हणाले. खासदाराचे काम आहे तुतारी वाजवणे ते वाजवत आहेत, त्यांचे पोट दुखत आहे असं म्हणत धनंजय मुंडेंनी खासदार बजरंग सोनावणे यांच्यावर टीका केली.

5 वर्षात मराठवाड्यात सर्वाधिक घरकुल आम्ही दिले

पाणी, घरकुल, लाडकी बहीण, निराधार योजना इथं सुरू आहे. 5 वर्षात मराठवाड्यात सर्वाधिक घरकुल आम्ही दिले. रेल्वेचे काम  या भागातच केले. ज्याच्यामुळे माझे घर फुटले त्यांनी मला सोडले नाही. वैद्यनाथ मंदिरावर त्यांनी हातोडा चालवला असे महणत दीपक देशमुख यांचे नाव घेता धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर टीका केली. माझे वडील अण्णांनी सांगितलं होतं की या हातांनी दिलेले दुसऱ्या हाताला कळलं नाही पाहिजे. हात तुटल्यावर 40 लाख रुपये दिले. जे माझ्यासोबत बेमानी करतो ते तुमच्यासोबत करणार नाही का? असे म्हणत दीपक देशमुख यांच्यावर मुंडेंनी टीका केली.

खासदाराचे काम आहे तुतारी वाजवणे ते वाजवत आहेत

गेल्या 1 वर्षापासून मी दोन वेळेला मरता मरता वाचलो आहे. माझं सगळं तुमच आहे. इथं जातीपातीचे राजकारण चालत नाही हे दाखवून द्या असे धनंज मुंडे म्हणाले. गेल्या 2 वर्षापासून परळीला बदनाम केले जात आहे. इथल्या मातीला मतदाराला बदनाम केले जात आहे, याचे उत्तर मतदानातून द्या. खासदाराचे काम आहे तुतारी वाजवणे ते वाजवत आहेत, त्यांचे पोट दुखत आहे असं म्हणत धनंजय मुंडेंनी खासदार बजरंग सोनावणे यांच्यावर टीका केली. माझ्यावर परळीकरांचे उपकार आहेत. 44 हजार मतांनी मला निवडून दिले आहे. नगर परिषदेतही असेच मतदान करा. परळीला 9 व थर्मल दिले होते ते रद्द झाले पण त्याच्या बदल्यात 350 मेगावॉट चा प्लांट इथं येणार आहे.

माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला शिक्षा द्या

मी एक वर्षापासून आजारी आहे तुमच्यामुळं मी इथ आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला शिक्षा द्या. कोई तुतारी नहीं, कोई पंजा नहीं सिर्फ घडी घडी घडी असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.