जास्त कराल तर कापून काढू, बावनकुळेंसमोर भाजप आमदाराची विरोधकांना धमकी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू असून सत्ताधाऱ्यांकडून दररोज कुणी ना कुणी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. कधी मतांसाठी निधीची धमकी दिली जातेय तर कधी पैशांचा खुलेआम वापर केल्याची कबूलीही दिली जातेय. याच दरम्यान भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलताना आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांना धमकी देताना जास्त कराल तर कापून काढू, असा दम दिला आहे. आशिष देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित ही भाषा वापरली आहे.
कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांला मारहाण झाली होती. ती मारहाण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे समजते. त्यावर बोलताना आशिष देशमुख यांनी विरोधकांना जास्त कराल तर कापून काढू, अशी धमकी दिली.

Comments are closed.