दुबार मतदार हाजिर हो!वॉर्ड ऑफिसमध्ये अर्ज भरून घेणार

डबल मतदान टाळण्यासाठी पालिकेने घरोघरी जनजागृती करण्यास सुरुवात केली असून, दुबार मतदारांना परिशिष्ट – 1 भरण्यासाठी ‘इंटिमेशन लेटर’ देण्यात येत आहे. यानुसार दुबार मतदारांना वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन ‘परिशिष्ट-1’ फॉर्म भरून द्यावा लागेल; अन्यथा मतदानाच्या दिवशी त्यांच्याकडून ‘दुबार मतदान करणार नाही’ असे हमीपत्र लिहून घेतले जाईल.
मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत एकाच व्यक्तीचे 103 वेळा नाव, तर 4 लाख 33 हजार मतदारांची दुबार नावे असल्याचे समोर आले आहे. सदोष मतदार याद्या दुरुस्ती करण्याची कार्यवाही महापालिका करीत आहे.

Comments are closed.