महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये ईडीचे छापे

मेडिकल कॉलेज चौकशी प्रकरणात मोठी कारवाई : दिल्ली, उत्तर प्रदेशमधील अनेक ठिकाणी शोधमोहीम

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी देशभरात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे मोठी कारवाई केली. ईडीने आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या 10 राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. दिल्लीतच ईडीने एकूण पाच ठिकाणी छापे टाकून शोधमोहीम सुरू केली होती. मेडिकल कॉलेजमधील काही दस्तावेज आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित ही शोधमोहीम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या छाप्यांमध्ये सात वैद्यकीय महाविद्यालयांचे कॅम्पस आणि एफआयआरमध्ये नाव असलेल्या अनेक व्यक्तींच्या निवासस्थानांचा समावेश आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या तपासणीशी संबंधित गोपनीय माहिती लीक करण्याच्या बदल्यात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) अधिकाऱ्यांना लाच देण्यात आल्याचा आरोप आहे. या माहितीचा वापर करून काही वैद्यकीय महाविद्यालयांनी अभ्यासक्रमांसाठी मान्यता आणि मंजुरी मिळविण्यासाठी पॅरामीटर्समध्ये फेरफार केल्याचा संशय आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने 30 जून रोजी नोंदवलेल्या 225 एफआयआरच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली.

सात वैद्यकीय महाविद्यालयांची ठिकाणे

वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना तपासणी मानकांमध्ये फेरफार करण्यास सक्षम केले गेल्यामुळे संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याची मान्यता मिळाली. या संगनमतामुळे शैक्षणिक संस्थांना मान्यता देण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी उघड झाल्यामुळे देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबद्दल चिंता निर्माण होते. हा मनी लाँड्रिंगचा खटला सीबीआयने जूनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरशी जोडलेला असून त्यामध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अधिकाऱ्यांसह सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्यात आल्याचा आरोप आहे. या बदल्यात महाविद्यालयांशी संबंधित प्रमुख व्यवस्थापन कर्मचारी आणि मध्यस्थांना वैद्यकीय महाविद्यालय तपासणीशी संबंधित गोपनीय माहिती देण्यात आली होती.

Comments are closed.