धरमजी माझ्यासाठी सर्वस्व होते! हेमा मालिनी यांची भावुक पोस्ट

बॉलीवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी अखेर सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. धरमजी माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती आयुष्यभर राहील, असे या पोस्टमध्ये लिहिले आहे. हेमा मालिनी यांनी पोस्टमध्ये लिहिले की, धरमजी माझ्यासाठी खूप काही होते. एक प्रेमळ पती, आमच्या दोन मुली ईशा आणि अहाना यांचे वडील, एक मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक, कवी, प्रत्येक अडचणीच्या वेळी माझे गरजेचे व्यक्ती. खरं सांगायचं तर ते माझ्यासाठी सर्व काही होते. चांगल्या आणि वाईट प्रत्येक काळात ते नेहमी माझ्यासोबत होते. त्यांनी त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे मन जिंकले होते. नेहमी सर्वांना प्रेम आणि आपुलकी देत होते. सर्वांना आपलेसे करून घेतले होते. माझी वैयक्तिक हानी शब्दांच्या पलीकडची आहे आणि जी पोकळी निर्माण झाली आहे, ती माझ्या संपूर्ण आयुष्यासोबत राहील. अनेक वर्षांच्या सहप्रवासानंतर माझ्याकडे पुढील आयुष्य जगण्यासाठी त्यांच्या खूप साऱया आठवणी आहेत, असे म्हटले आहे.

Comments are closed.