आयएसआय ऑपरेटीव्ह रिझवानच्या मित्रालाही अटक करण्यात आली आहे

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप

नूह: हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील खरखडी गावातील रहिवासी अन् वकील असलेल्या रिझवानला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्याचा सहकारी अॅडव्होकेट मुशर्रफ उर्फ परवेजलाही ताब्यात घेण्यात आले आहे. रिझवानच्या अटकेच्या 6 तासांमध्येच पोलिसांनी परवेजला अटक केली आहे. विशेष म्हणजे परवेजचा मोठा भाऊ सैन्यात कार्यरत आहे. परवेज पाकिस्तानचा हस्तक नसल्याचा दावा त्याच्या परिवाराने केला आहे. आमचा परवेजवर पूर्ण भरवसा आहे. तो आजवर पाकिस्तानात गेलेला नाही. न्यायिक प्रक्रियेत आम्ही पूर्ण सहकार्य करत परवेजचे निर्दोषत्व सिद्ध करू असा दावा त्याच्या परिवाराने केला आहे. नूंह जिल्ह्यात पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी सातत्याने होणाऱ्या अटकेच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

Comments are closed.