तैमूर नेटवर्कने पटकावले आमदार चषकाचे जेतेपद; आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला तुफान यश
वर्सोवा विधानसभा आयोजित हारून खान आमदार चषक प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अखिल हिंदुस्थानी ओपन हाफ क्रिकेट स्पर्धेत तैमूर नेटवर्कने बाजी मारली. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील नामांकित खेळाडूंच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला प्रचंड यश मिळाले असून, हा चषक वर्सोव्यासाठी एक मैलाचा दगड ठरला आहे.
‘अखिल हिंदुस्थानी ओपन हाफ क्रिकेट’ स्पर्धेचा अंतिम सामना एमयुसीसी ओडिशा आणि तैमूर नेटवर्क मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स या बलाढय़ संघांमध्ये खेळला गेला. या चुरशीच्या सामन्यात तैमूर नेटवर्पने 7 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला आणि पहिल्या ‘आमदार चषक’ स्पर्धेवर आपले नाव कोरले. विजेत्या तैमूर इलेव्हनला पाच लाखांचा पुरस्कार लाभला. उपविजेता ओडिशा संघ तीन लाखांचा मानकरी ठरला.
स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार केतन म्हात्रेने पटकावला तर इमरोज खान सर्वोत्तम गोलंदाज ठरला. महेश नांगुडे ‘मालिकावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला. या ‘अखिल हिंदुस्थानी ओपन हाफ क्रिकेट’ स्पर्धेत शिफा स्ट्रायकर्स, पंधारी किंग्स, उमर इलेव्हन, ताई पॅकर्स, पालघर, अमर साई, गोरखपूर, एमयूसीसी, ओडिशा, तैमूर नेटवर्प मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स, ए. के. स्पोर्ट्स, कणकवली यांसारख्या संघांनी सहभाग घेतला होता.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीने स्पर्धेची शोभा वाढली
आमदार हारून खान यांच्या प्रयत्नांमुळे वर्सोव्याच्या क्रिकेट मैदानात पहिल्यांदाच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक सुप्रसिद्ध खेळाडू आपला खेळ दाखवताना दिसले. आपल्या ‘हीरोंना’ थेट मैदानात खेळताना पाहण्यासाठी हजारो स्थानिक रहिवाशांनी गर्दी केली होती, ज्यामुळे स्टेडियममध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
आमदार आरोन माझे यांच्या प्रयत्नांचे कौतुक
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी आमदार हारून खान यांच्या या अभूतपूर्व आयोजनाबद्दल आभार मानले. वर्सोव्यात प्रथमच मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्यामुळे ‘आमदार चषक’ खऱ्या अर्थाने एक महाउत्सव ठरला.
Comments are closed.