पक्ष्यांच्या धडकेमुळे लष्करी ड्रोन क्रॅश झाला

सर्कल इन्स्टिट्यूट/हिसार

हरियाणातील हिसार येथील हंसी येथे गुरुवारी सकाळी कापड गिरणीच्या छतावर ड्रोन कोसळल्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सदर ड्रोनमध्ये कॅमेराही होता. पक्ष्याची धडक बसल्यामुळे ते कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. या ड्रोनबाबत मिल व्यवस्थापनाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर डीएसपी विनोद शंकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असता सदर ड्रोन लष्कराचे असल्याचे स्पष्ट झाले. यासंबंधी लष्करी अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर काही वेळातच त्यांनी घटनास्थळ गाठत ड्रोन ताब्यात घेतले. हे एक टेहळणी ड्रोन असून ते कॅन्टोन्मेंट भागातून सोडण्यात आले होते अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

Comments are closed.