चंद्रपूर-मोहर्ली रस्त्यावर वाघाने अडवली वाट; प्रवासी खोळंबले

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील चंद्रपूर-मोहर्ली मार्गावर वाघाने वाट अडवून धरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाघाने वाट अडवल्याने या मार्गाने जाणारे प्रवासी खोळंबले होते. वाघ रस्त्यातून हटेल आणि आपल्याला रस्ता मिळेल, या आशेने प्रवासी ताटकळत आहे. मात्र, वाघ त्यांच्याकडे दुर्लक्ष करत रस्त्यावरच लोळत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
अलीकडेच मधू वाघिणीच्या बछड्याने चक्क रस्त्यावरच ठिय्या मांडला. तो उठेल आणि आपल्याला जाता येईल असे पर्यटकांसह त्या गावातील गावकऱ्यांना देखील वाटत होते. मात्र, वाघ त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहता रस्त्यावरच मजेत वावरत आहे. हे दृश आकाश आलाम यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले. चंद्रपूर-मोहर्ली मार्गावर कायमच वाघाचे दर्शन होत असतात. बफरक्षेत्र असल्याने गावातील लोक याच रस्त्याने जाणेयेणे करतात. त्यामुळे वाघांशी त्यांचा सामना कायमच ठरलेला आहे. मोहर्ली मार्गावर कायमच वाघांचा वावर असल्याने दुचाकीस्वारांसाठी ते धोकादायक ठरत चालले आहे.

Comments are closed.