Skin Care Tips : तिशीनंतर त्वचा तरुण ठेवणारे पदार्थ

तिशीनंतर त्वचा तरुण दिसावी यासाठी आहारात पोषकघटकांचा समावेश असणे आवश्यक असते. या पोषकघटकांद्वारे शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढते. कोलेजन हे त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रोटीन आहे. कोलेजनचे प्रमाण शरीरात व्यवस्थित असेल तर त्वचा तरुण दिसते आणि सैल पडत नाही. त्यामुळे तिशीनंतर कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी आहारात पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करायल हवा. आज आपण जाणून घेऊयात असे पदार्थ जाणून घेऊयात जे त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवतील आणि त्वचा तरुण दिसण्यास मदत होईल.

त्वचेसाठी कोलेजन हे प्रोटीन का महत्त्वाचे?

वाढत्या वयोमानानुसार शरीरातील कोलेजनच्या उत्पादनावर परिणाम होण्यास सुरुवात होते. यात त्वचेवर सुरकुत्या येणे, त्वचा सैल पडणे सारख्या समस्या निर्माण होतात. कोलेजन त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रोटीन आहे, कारण त्वचेला घट्ट करणे, लवचिक बनवण्याचे काम कोलेजन करते. तिशीनंतर याचे उत्पादन कमी होत जाते.

सोयाबीन जेवण

सोयाबीन, सोयाबीन दूध, टोफू यांसारखे पदार्थ त्वचेसाठी उपयुक्त असतात. यात जेनेस्टीन असते, जे कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते.

हेही वाचा – Onion Juice : केसांच्या अनेक समस्यांवर उपाय आहे कांद्याचा रस

बटाटे

बटाट्याच व्हिटॅमिन A , फायबर असतात, हे पदार्थ कोलेजन तयार करण्यात मदत करतात आणि त्वचा लवचिक बनवतात.

कडधान्ये

मुग, हरभर, मसूर कडधान्ये खायला हवीत. यात भरपूर प्रोटीन असते. जे कोलेजन वाढवतात.

ड्रायफूट

चिया सीड्स, अळशीच्या बिया, बदाम, अक्रोड खावेत. हे पदार्थ ओमेगा 3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन ई यांचा उत्तम स्त्रोत आहेत.

फळे –

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रासबेरी यांसारख्या फळांमध्ये ऍटी-ऑक्सिडंट्स असतात. हे पदार्थ त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात आणि कोलेजनचे उत्पादन वाढवतात.

हिरव्या पालेभाज्या –

पालक, ब्रोकोली यासारख्या हिरव्या पालेभाज्या त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.

हेही वाचा – Bride Jewellery Shopping: लग्नासाठी नववधुची ज्वेलरी घेताय? मग ‘या’ चुका टाळा; अन्यथा बिघडेल लूक

Comments are closed.