IND vs SA: दक्षिण आफ्रिका विरुद्ध मैदानात उतरताच विराट–रोहित रचणार इतिहास! सचिन-द्रविड यांचा मोठा विक्रम मोडला जाणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिका (ODI Series in between IND vs SA) यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मालिकेचा पहिला सामना रांचीच्या JSCA स्टेडियममध्ये खेळला जाईल. दोन्ही संघ रांचीमध्ये पोहोचले आहेत आणि जोरदार तयारी करत आहेत. या सामन्यात पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma & Virat Kohli) या दोन भारतीय दिग्गजांवर सर्वांची नजर असेल. मैदानात उतरतात क्षणी रोहित-कोहलीची जोडी नवा इतिहास रचणार आहे.
ऑस्ट्रेलिया नंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत धमाका करण्यास सज्ज आहेत. रांचीमध्ये होणाऱ्या पहिल्या वनडेमध्ये हे दोघे एकत्र खेळताना दिसतील. मैदानात उतरतात क्षणी रोहित-कोहलीची जोडी एकत्रित सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी भारतीय जोडी बनेल.
यासोबतच कोहली-रोहितची जोडी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी (Sachin Tendulkar & Rahul Dravid) एकत्र खेळलेल्या 391 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विक्रम मोडेल. सध्या रोहित-कोहली यांनी देखील तितकेच म्हणजे 391 सामने एकत्र खेळले आहेत. जगात एकत्र सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम संगकारा आणि जयवर्धने यांच्या नावावर असून त्यांनी 550 सामने एकत्र खेळले आहेत.
एकत्र सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या भारतीय जोड्या
रोहित-कोहली – ३९१
सचिन–द्रविड – 391
द्रविड-गांगुली – ३६९
सचिन–कुंबळे – 367
सचिन-गांगुली – ३४१
कोहली-जडेजा – ३०९
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 0-2 ने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता भारतीय संघ वनडे मालिकेत हा हिशोब चुकता करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियात रोहितने उत्कृष्ट खेळ केला होता आणि विराटनेही मागील वनडेमध्ये अर्धशतक ठोकत फॉर्ममध्ये पुनरागमन केले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्यांच्या भक्कम कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा असेल.
वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिला वनडे: 30 नोव्हेंबर – रांची
दुसरा वनडे: 3 डिसेंबर – रायपूर
तिसरा वनडे: 6 डिसेंबर – विशाखापट्टणम
Comments are closed.