IND vs SA: ऋतुराज की जयस्वाल कोणाला मिळणार संधी? पहिल्या वनडेत अशी असणार भारताची प्लेइंग इलेव्हन!

कसोटी मालिकेत मिळालेल्या लाजिरवाण्या पराभवाचा हिशोब टीम इंडिया (Team india vs South Africa) आता वनडे मालिकेत चुकता करण्यास तयार आहे. के.एल. राहुलच्या (KL Rahul Under Captaincy) नेतृत्वात भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत दमदार खेळ करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, शुबमन गिल (Shubman gill), श्रेयस अय्यर (Shreyas iyer & Hardik pandya) आणि हार्दिक पंड्या हे स्टार खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.

रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) डावाची सुरुवात यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) करताना दिसू शकतो. नंबर 3 ची जबाबदारी विराट कोहली सांभाळेल. नंबर 4 वर ऋषभ पंत (Rishbh Pant) दमदार फलंदाजी करताना मैदानात दिसू शकतो. तिलक वर्मालाही (Tilak Verma) प्लेइंग-11 मध्ये संधी दिली जाऊ शकते.

अष्टपैलू खेळाडू म्हणून संघ व्यवस्थापन नीतीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यावर विश्वास दाखवू शकते.
वेगवान गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंग (Arshdeep singh) सांभाळेल आणि त्याला हर्षित राणाची (Harshit Rana) साथ मिळेल.

टीम इंडिया वनडे मालिका जिंकून कसोटी मालिकेतील पराभवाचा हिशोब पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असेल.

Comments are closed.