महावितरणची रत्नागिरी विभागात 37 कोटी 51 लाखांची वीजबिल थकबाकी, 3 हजार 21 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

महावितरणच्या वीजबीलांची थकबाकी वाढली आहे.रत्नागिरी विभागातील अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 1 लाख 72 हजार 181 ग्राहकांकडे 37 कोटी 51 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. वीज बिल थकवणाऱ्या रत्नागिरी विभागातील 3 हजार 21 वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करण्यात आला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील 1 हजार 749 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 हजार 272 ग्राहकांचा समावेश आहे.
रत्नागिरी विभागातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती 1 लाख 49 हजार 228 ग्राहकांकडे 22 कोटी 92 लाख, व्यावसायिक 14 हजार 852 ग्राहकांकडे 7 कोटी 62 लाख, औद्योगिक 2 हजार 176 ग्राहकांकडे 3 कोटी 93 लाख, सार्वजनिक सेवा वर्गवारीतील 5 हजार 533 ग्राहकांकडे 2 कोटी 69 लाख आणि इतर वर्गवारीतील 392 ग्राहकांकडे 34 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहर विभागात एकूण 44 हजार 330 ग्राहकांकडे 8 कोटी 79 लाख, खेड विभागात 27 हजार 143 ग्राहकांकडे 5 कोटी 2 लाख, चिपळूण विभागात 24 हजार 728 ग्राहकांकडे 4 कोटी 30 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात 36 हजार 786 ग्राहकांकडे 8 कोटी 82 लाख, कुडाळ विभागात 39 हजार 194 ग्राहकांकडे 10 कोटी 58 लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजग्राहकांना वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने वीजबिलाचा भरणा करता येतो. ग्राहकांना देय रक्कमेवर 0.25 टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. या व्यतिरिक्त महावितरणने 5 हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Comments are closed.