Soap Side Effects: अंघोळ करताना साबण वापरणं कितपत सुरक्षित? तज्ञांनी सांगितली योग्य पद्धत
अंघोळ करणं प्रत्येकाच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग असतं. यासाठी बहुतांश जण साबण किंवा बॉडी वॉश वापरतात. बाजारातील ही उत्पादने नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केल्याचा दावा केला जातो. म्हणून आपण ती सर्रास खरेदी करतो. पण ते आपल्या त्वचेसाठी खरंच चांगलं असतं का? याचाही विचार करायला हवा. साबण वापरणं त्वचेसाठी कितपत सुरक्षित आहे? ते जाणून घेऊया…( Is Soap Dangerous For Skin? )
साबणामुळे त्वचा स्वच्छ होत असली तरी त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. साबणामुळे शरीरातील घाण, तेल आणि बॅक्टेरिया निघून जातात. मात्र त्यात हाय pH गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा आणि pH संतुलनात अडथळा निर्माण होतो. यामुळे कोरडी त्वचा, जळजळ आणि त्वचेचे संसर्ग होऊ शकतात. शिवाय साबण चेहऱ्यासाठीही हानिकारक ठरू शकतं, कारण चेहऱ्याची त्वचा पातळ आणि संवेदनशील असते. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
साबणाऐवजी अंघोळीसाठी काय वापरावं?
जर तुम्हाला साबणाऐवजी काय वापरावं हा प्रश्न पडला असेल तर तज्ञांनी एक सोपी पद्धत सांगितली आहे. त्यासाठी एक टॉवेल घ्या आणि तो गरम पाण्यात भिजवा. या टॉवेलने तुमचे अंग स्वच्छ पुसून घ्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ करा. हिवाळ्यात यासाठी गरम पाणी वापरा मात्र उन्हाळ्यात तुम्ही थंड पाण्याचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या शरीरावरील घाण निघून जाईल.
बेसन
तसेच बेसन दुधात मिसळा. ही पेस्ट तुमच्या संपूर्ण शरीरावर स्क्रबप्रमाणे घासून घ्या. नंतर आंघोळ करा. यामुळे तुमच्या शरीरावरील घाण निघून जाईल.
मुलतानी माती
तुम्ही अंघोळीसाठी मुलतानी माती देखील वापरू शकता. मुलतानी मातीमध्ये पाणी मिसळून ते तुमच्या अंगाला लावा. यामुळे तुमच्या शरीरावर साचलेली घाण पूर्णपणे निघून जाईल.
दूध
यासाठी, ४ ते ५ चमचे कच्चे दूध संपूर्ण अंगावर चोळा आणि नंतर पाण्याने अंघोळ करा. यामुळे अंग स्वच्छ होते. हे काही घरगुती उपाय तुम्ही साबणाऐवजी अंघोळ करताना वापरू शकता. यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होत नाही.
टीप- ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
हेही वाचा: हिवाळ्यात हेअर ड्रायर वापरणे कितपत सुरक्षित? केसांचं होऊ शकतं नुकसान
Comments are closed.