स्मृती मानधनाची मैत्रीण श्रेयांकाने पलाशला मुलीसोबत रंगेहात पकडले?

टीम इंडियाची स्टार महिला खेळाडू आणि वर्ल्डकप विजेती स्मृती मानधनाच्या लग्नाच्या दिवशी तिचे वडील आजारी पडल्याने तिचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान हे लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छलचे एका मुलीसोबतचे चॅट व्हायरल झाले असून पलाशने स्मृतीला धोका दिल्याने हे लग्न मोडल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून त्यात पलाश व त्या मिस्टरी गर्लबद्दल धक्कादायक माहिती दिलेली आहे.

पलाश हा त्यांचा कॉरिओग्राफर बॉस्को याच्या टीममधील एका मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडला गेल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. स्मृतीची मैत्रीण व टीम इंडियातील खेळाडू श्रेयांका पाटील हिने पलाश व त्या मुलीला नको त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर तिने याबाबत स्मृती मनधाना हिला सांगितले व स्मृतीने त्यांना रंगेहात पकडले.

Comments are closed.