आशा’चे प्रेरणादायी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला संघर्ष आणि जिद्दीची गर्जना करणारे गीत प्रदर्शित – Tezzbuzz

चालत रहा पुढं… चालत रहा पुढं… अशी अस्मितेने भरलेली हाक देत ‘आशा’ चित्रपटाचे प्रेरणादायी गाणं नुकतेच प्रदर्शित झाले असून ते प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसत आहे. गीतकार वलय मुळगुंद यांनी लिहिलेल्या शब्दांना संगीतकार आशिष झा यांनी प्रभावी संगीत दिले असून गायिका प्राची केळकर यांच्या दमदार आवाजाने हे गाणे अधिकच सशक्त झाले आहे.  या गाण्यात संघर्षाची ठिणगी, आशेची ज्योत आणि प्रत्येक पावलागणिक उलगडणाऱ्या प्रकाशाची नवी चाहूल जाणवते.  मनाला उभारी देणारे हे ॲंथम साँग केवळ ‘आशा’ सेविकेचे नसून त्या प्रत्येक स्त्रीचे आहे, जिचा अंतरंगात दडलेल्या उजेडावर विश्वास आहे.

या गाण्याबद्दल दिग्दर्शक दिपक पाटील म्हणतात, ” ‘आशा’मधील हे गाणं म्हणजे प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे. ही केवळ आशा सेविकांची गोष्ट नाही, तर कुटुंबासाठी झगडणाऱ्या, स्वप्नांसाठी लढणाऱ्या आणि कोणत्याही संकटात न डगमगणाऱ्या प्रत्येक बाईची प्रेरक धडाडी आहे. या गाण्यातून आम्ही तिच्या ताकदीला आणि तिच्या अविरत प्रवासाला सलाम केला आहे.”

‘आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया आणि समाजाप्रती असलेली त्यांची अमर्याद जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रिंकू राजगुरू, सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Comments are closed.