अमेरिकेच्या नागरिकांना 2000 डॉलर्स वाटपाच्या घोषणेनंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा, आयकर लवकरच रद्द
न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी टॅरिफचा वापर जोरदारपणे केला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नागरिकांना एक दिवस आयकर द्यावा लागणार नाही असं म्हटलं. टॅरिफच्या माध्यमातून अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असल्यानं आयकर येत्या काही वर्षात रद्द करु असं, ट्रम्प म्हणाले.
आयकर रद्द करणार : डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी म्हटलं की त्यांचं प्रशासन त्या दोन वर्षात आयकर पूर्णपणे संपुष्टात आणणार आहे. आमचं सरकार टॅरिफमधून महसूल किंवा पैसे जमवत असल्यानं आयकर रद्द करणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं.
येत्या काही वर्षात मला वाटतं आयकर कमी करत आहोत, पूर्णपणे आयकर देखील कमी करु शकतो,असं ट्रम्प यांनी म्हटलं. आपण यातून खूप पैसे घेत असल्यानं कदाचित पूर्णपणे रद्द करु शकतो, असं ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मिलिटरी सर्व्हिसेसच्या सदस्यांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना म्हटलं.
टॅरिफमधील कमाई अमेरिकेच्या लोकांना देणार
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेला महान करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार त्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प यांनी टॅरिफचा वापर करत विविध देशांसोबत व्यापारी करार त्यांच्या अटीवर करुन घेतले आहेत. ट्रम्प यांनी विविध देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लादलं आहे. म्हणजेच अमेरिकेतून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर ते दुसरे देश जे जितकं आयात शुल्क लावतात. तितकेच आयात शुल्क अमेरिका त्या देशांतून आयात होणाऱ्या वस्तूंवर लावणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका जितकी कमाई टॅरिफमधून करेल त्यापैकी काही रक्कम देशातील नागरिकांना देणार असल्याचं जाहीर केलं आहे. अमेरिकेतील नागरिकांना 2000 डॉलर देणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं.
भारतावर 50 टक्के टॅरिफ
अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं आहे. त्याशिवाय भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादलं. म्हणजेच भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी कराराबाबत चर्चा सुरु आहे. व्यापार कराराबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर भारतावरील टॅरिफ कमी होऊ शकतं.
ट्रम्प यांनी चीनचे नेते शी जिनपिंग यांनी अमेरिकेच्या कृषी उत्पादनांची खरेदी बाबतचा वेग आणि मोठ्या क्षमतेनं वाढवण्यावर सहमती दर्शवल्याचं शी जिनपिंग यांनी म्हटलं. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी ब्राझीलवर टॅरिफमध्ये वाढ केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.