सोनिया-राहुल गांधी यांच्यावर एफआयआर

काँग्रेसने ठरविले सूडाचे राजकारण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या आहेत. सोनिया आणि राहुल गांधींच्य विरोधात नवा एफआयआर नोंद झाला आहे. यात सोनिया गांधी तसेच राहुल समवेत अन्य 6 जणांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याचबरोबर एफआयआरमध्ये 3 कंपन्यांची नावेही नोंद करण्यात आली आहेत.

नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा तपास संपुष्टात आल्यावर ईडीने याचा अहवाल दिल्ली पोलिसांना सोपविला होता. दिल्ली पोलिसांनी यानंतर एफआयआर नोंदविला आहे. काँग्रेसची मालकी असलेली संस्था असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे फसवणुकीद्वारे अधिग्रहण करण्यात आल्याचा एफआयआरमध्ये आरोप आहे. या संस्थेची एकूण संपत्ती 2000 कोटी रुपयांची होती. यंग इंडियनच्या माध्यमातून हे अधिग्रहण पार पडले होते आणि गांधी परिवाराची यात 76 टक्के हिस्सेदारी होती.

सॅम पित्रोदांवरही आरोप

दिल्ली पोलिसांकडून नोंदविण्यात आलेल्या एफआयआरमध्ये सोनिया गांधी आणि राहुल यांच्यासोबत इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा समवेत अन्य 3 जणांची नावे सामील आहेत. याचबरोबर एजेएल, यंग इंडियन आणि टोटेक्स मर्चेंटाइज प्रायव्हेट लिमिटेडचे नावही नमूद आहे. या तिन्ही कोलकाता आधारित बनावट कंपन्या होत्या. यात यंग इंडियाला 1 कोटी रुपये देणे आणि 50 लाखांमध्ये एजेएलचे अधिग्रहण करण्याचा आरोप आहे. एजेएलची एकूण संपत्ती 2000 कोटी रुपयांचा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दिल्ली पोलीस एजेएलच्या समभागधारकांना लवकरच चौकशीसाठी बोलावू शकते.

काय आहे पूर्ण प्रकरण?

नॅशनल हेराल्ड प्रकरणात 2008-14 दरम्यान मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. 2014 साली तत्कालीन भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीच्या आधारावर दिल्लीतील पतियाळा हाउस न्यायालयाने या प्रकरणी दखल घेण्याचा आदेश दिला होता. 9 एप्रिल रोजी गांधी परिवारासमवेत अन्य लोकांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नेंद झाला होता. परंतु काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळत ईडीवर केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार काम करण्याचा आरोप केला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जोडीने काँग्रेसच्या नेतृत्वाच्या विरोधात छळ, धमकी आणि सूडाचे राजकारण जारी ठेवल्याचा आरोप काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी केला आहे.

Comments are closed.