‘सेंच्युरी किंग’ विराट कोहली; सचिन तेंडुलकरचा 51 कसोटी शतकांचा विक्रम मोडला

विव्ह रिचर्डसप्रमाणे किंग झालेला विराट कोहली आता क्रिकेटमध्ये ‘सेंच्युरी किंग’ ठरला आहे. त्याने रांचीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक शतक झळकावताना आपल्या शतकांचा आकडा 52 वर नेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 51 कसोटी शतकांचा विश्वविक्रम मागे टाकला. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज ठरला आहे. ही केवळ वैयक्तिक कामगिरी नव्हे, तर हिंदुस्थानी क्रिकेटच्या निळय़ा आकाशात कोहलीच्या नव्या सुवर्णयुगाची चाहूल ठरलीय.
विक्रमांची मालिकाच ः तेंडुलकरला मागे टाकणारी 'विराट' कामगिरी
या शतकासह कोहलीने तेंडुलकरचा कसोटी क्रिकेटमधील 51 शतकांचा विश्वविक्रम मागे टाकला. ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 83 वी शतकी खेळी ठरली. इतपंच नाही, तर हिंदुस्थानात सर्वाधिक ‘फिफ्टी-प्लस’ धावा (59) काढणाऱया खेळाडूचाही मान त्याने पटकावला. हा विक्रमही तेंडुलकरच्याच (58) च्या नावावर होता. कसोटीत सर्वाधिक शतके (51) सचिनने ठोकली आहेत तर वन डेत कोहलीने. टी-20 त मॅक्सवेल आणि रोहित शर्माने प्रत्येकी पाच-पाच शतके ठोकली आहेत. आता तिन्ही फॉरमॅटचा विचार करताना यात किंग कोहलीची 52 शतके सर्वात पुढे आहेत.
रांचीचे भाग्यवान मैदान
जेएससीए स्टेडियम कोहलीसाठी फलंदाजीचं तीर्थक्षेत्र ठरतेय. येथील सहा डावांत 173 च्या सरासरीने त्याने 519 धावा केल्यात. यात तीन शतके आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे.

Comments are closed.