कापून काढण्याची भाषा करणाऱ्या भाजप आमदाराला सुनील केदार यांचे आव्हान, जागा, तारीख आणि वेळ सांगा!

विरोधकांना कापून काढण्याची भाषा करणारे भाजपचे आमदार आशीष देशमुख यांना काँग्रेस नेते सुनील केदार यांनी प्रतिआव्हान दिले आहे. ‘धमक्या देणाऱयांमध्ये इतकीच आग असेल तर त्यांनी जागा, तारीख-वेळ सांगावी. आम्ही तयार आहोत,’ असे केदार यांनी सुनावले.
नागपूर जिह्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये जिह्यात अटीतटीची लढत आहे. सावनेर मतदारसंघात आशीष देशमुख व सुनील केदार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, धमक्या दिल्या जात आहेत. देशमुख यांनी नुकतीच विरोधकांना धमकी दिली होती. ‘फडणवीस मुख्यमंत्री आहेत, ते नागपूरचे आहेत, त्यांच्याकडे गृह खाते आहे. त्यामुळे कोणी आमच्या वाटय़ाला गेला तर कापून काढू, असे ते म्हणाले होते. केदार यांनी सावनेरमध्ये प्रचारसभेत त्यांना प्रत्युत्तर दिले. ‘कोणी धमक्या देत असेल तर चिंता करण्याची गरज नाही,’ अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्तही केले.

Comments are closed.