रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते
विराट कोहलीने भारतासाठी फक्त एकदिवसीय खेळण्याची पुष्टी केली: बीसीसीआयकडून सुरू असलेल्या चर्चांना अखेर विराट कोहलीने स्वतः कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेणार की नाही, यावरील अटकळीवर मौन सोडलं आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध 0-2 ने झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय कोहलीशी पुन्हा कसोटी खेळण्याबाबत बोलणार अशी चर्चा रंगली होती. घरच्या मैदानावर टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे या अफवांना अधिक हवा मिळाली. एकेकाळी भारताला भारतात कसोटी जिंकणं कठीण होतं, पण गेल्या 12 महिन्यांत दोनदा टीम इंडिया घरच्या मालिकेत क्लीन स्वीप झाली आहे.
बीसीसीआयचे संयुक्त सचिव देवजीत सैकिया यांनी अलीकडेच एका चॅनेलशी बोलताना स्पष्ट केलं की, “विराट कोहलीबाबत पसरवली जाणारी माहिती ही केवळ अफवा आहे. कसोटी रिटायरमेंटबाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. अफवांना महत्व देऊ नका. असं काहीही घडलं नाही.”
आनंदाची झेप ❤️💯
विराट कोहलीची चांगलीच मनोरंजक खेळी 🍿
अपडेट्स ▶️ https://t.co/MdXtGgRkPo#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @imVkohli pic.twitter.com/llLByyGHe5
— BCCI (@BCCI) 30 नोव्हेंबर 2025
रांची वनडेत कोहलीची 135 धावांची तुफानी खेळी….
दरम्यान, विराट कोहली दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार फॉर्ममध्ये दिसला. मालिकेच्या पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या वनडे करिअरमधील ऐतिहासिक शतक ठोकलं. रांची वनडेमध्ये त्याने 135 धावांची तुफानी खेळी करून प्लेयर ऑफ द मॅचचा किताब मिळवला. अवॉर्ड स्वीकारताना जेव्हा कोहलीला विचारण्यात आलं की, पुढेही तो फक्त एकाच फॉर्मेटमध्ये दिसणार का? तेव्हा त्याने ठामपणे सांगितलं, “हो, नेहमीच असेच चालणार आहे. मी फक्त एकाच प्रकारचा खेळ खेळत आहे.”
विराट कोहलीच्या ८३व्या आंतरराष्ट्रीय शतकाने भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून दिला#INDvSA 📝: https://t.co/tnte0Vp08D pic.twitter.com/7vNXUOOcml
— ICC (@ICC) 30 नोव्हेंबर 2025
यावरून आता कोहलीने स्पष्ट संदेश दिला आहे की, तो पुढे फक्त वनडे फॉर्मेटमध्येच खेळणार आहे. आता पाहणं मनोरंजक ठरेल की 2027 वर्ल्ड कपच्या योजनांबाबत टीम मॅनेजमेंट कोणता निर्णय घेते. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही पुढील वर्ल्ड कपच्या योजनांमध्ये नाहीत. यंदा इंग्लंड दौऱ्यापूर्वी कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सगळ्यांना धक्का दिला होता. 123 कसोटी सामने, 29 शतके आणि जवळपास 10,000 धावांच्या टप्प्यापासून काहीच अंतरावर असताना त्याने हा फॉर्मेट अलविदा केला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.