अंतिम सामन्यात पावसाचा विजय; हिंदुस्थान-अफगाणिस्तान सामना रद्द

खराब हवामानामुळे हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यातील 19 वर्षांखालील तिरंगी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पावसाने बाजी मारली. पावसामुळे अंतिम सामना रद्द घोषित करण्यात आला. पावसासह अपुऱ्या प्रकाशामुळे सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही आणि त्यामुळे अंतिम लढतीचा निकाल लागलाच नाही. परिणामतः दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या हिंदुस्थान संघाने 19 षटकांत पाच बाद 79 धावा केल्या होत्या. मात्र सुरुवात अत्यंत अडखळलेली ठरली. अफगाणिस्तानचा वेगवान मारा गोलंदाज अब्दुल अजीजने कर्णधार विहान मल्होत्रा आणि वंश आचार्यचे विकेट घेत हिंदुस्थानला प्रारंभीच हादरे दिले. परिणामी अवघ्या 24 धावांत चार फलंदाज बाद झाले. तेव्हा निष्क चौहान (नाबाद 28) आणि अभिज्ञान पुंडू (27) यांनी संयमी फलंदाजी करत पाचव्या विकेटसाठी 51 धावांची मोलाची भागीदारी रचली, मात्र त्याचवेळी अवकाळी पावसाने डाव थांबवला. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर पंचांनी अखेर सामना रद्द घोषित केला.

Comments are closed.