महिला आमदाराचा कर्करोगाने मृत्यू
केरळमधील घटना
वृत्तसंस्था/ कोझिकोड
केरळमधील सीपीआय-एमच्या नेत्या आणि कोयिलंडीच्या विद्यमान आमदार कनाथिल जमीला यांचे शनिवारी रात्री कोझिकोड येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. 59 वर्षीय जमीला ह्या सध्या कर्करोगावर उपचार घेत होत्या. जमीला यांनी राज्यातील महिला चळवळीला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जमीला यांच्या निधनाने आमच्या पक्षाचे, महिला चळवळीचे आणि संपूर्ण समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. या दु:खद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबासमवेत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 2021 च्या निवडणुकीत केरळ विधानसभेत प्रवेश करणाऱ्या जमीला यांनी गृहिणीपासून केरळच्या सर्वात आदरणीय तळागाळातील नेत्यांपैकी एक बनण्याची उल्लेखनीय कामगिरी केली होती.
Comments are closed.