ड्रेसिंग रूममध्ये रोहित अन् गंभीरमध्ये झाला वाद? सोशल मीडियावर फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं? जा
Rift Between Rohit Sharma-Gautam Gambhir Photos Viral: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची येथे झालेल्या पहिल्या वनडेत टीम इंडियाने 17 धावांनी शानदार विजय मिळवला. विराट कोहलीच्या दमदार शतकाने आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाने भारताने डोंगरा धावसंख्या उभारली. त्यानंतर कुलदीप यादव, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग या त्रिकुटाने अफलातून गोलंदाजी करत सामना भारताच्या खिशात टाकला.
ड्रेसिंग रूममध्ये रोहित अन् गंभीरमध्ये झाला वाद?
मात्र, सामन्यानंतर सोशल मीडियावर एक वेगळाच मुद्दा चर्चेत आला. तो म्हणजे रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे ड्रेसिंग रूममधून व्हायरल होत असलेले फोटो. या फोटोमध्ये दोघेही गंभीर मुद्द्यावर चर्चा करताना दिसत आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये एकच प्रश्न पडला की, दोघांमध्ये वाद झाला का?
सोशल मीडियावर फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य
पण केवळ फोटो पाहून कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. अशा क्षणचित्रांमधून संपूर्ण संभाषणाचा संदर्भ समजणे कठीण असते. त्यामुळे दोघांच्या चेहऱ्यावर गंभीरता दिसत असली तरी प्रत्यक्षात वाद झाला असे स्पष्टपणे म्हणता येत नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली वनडे जिंकल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मा एकत्र आणि बोलत होते.
त्यांच्यात काय चर्चा झाली असेल याचा कोणी अंदाज लावू शकेल??? pic.twitter.com/iyeUmNH6gM
— आशु (@AshuKharwa66211) १ डिसेंबर २०२५
शेवटच्या षटकात टीम इंडियाचा विजय…
प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 बाद 349 धावा केल्या. विराट कोहलीने आपल्या क्लासिक अंदाजात 135 धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 11 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकार मारले. रोहित शर्माने तुफानी सुरुवात करीत 57 धावा केल्या, तर कर्णधार केएल राहुलनेही 60 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रत्युत्तर दक्षिण आफ्रिकेनं प्रयत्न केला, पण भारतीय गोलंदाजांच्या अचूक योजनांसमोर त्यांची 332 धावांवर दमछाक झाली.
कुलदीप-राराना चमकले
कुलदीप यादवने अफलातून फिरकी टाकत 4 विकेट घेतल्या. हर्षित राणाने तर दुसऱ्याच ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला दोन मोठे धक्के देत सामना भारताकडे झुकवला. अर्शदीप सिंगनेही 2 महत्त्वाचे झटके देत विजय पक्का केला. अफ्रिकेकडून मैथ्यू ब्रेट्झके (72), मार्को जानसेन (70) आणि कॉर्बिन बोश (67) यांनी चांगली कामगिरी केली. एकूणच, फलंदाज आणि गोलंदाज या दोघांच्या एकत्रित योगदानाने भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
🚨 भारतीय संघात अडचण! 🚨
अहवाल सांगतो की संघाला समस्या आहेत. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा बोलत नाहीत. यावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआयची बैठक होणार आहे. pic.twitter.com/OSXq0R0qXM
— सॅम (@Cricsam01) १ डिसेंबर २०२५
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.