पुन्हा रोहित शर्मा अन् विराट कोहली द. आफ्रिकेला धू धू धुणार; दुसरा वनडे सामना कधी अन् कुठे रंगण
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुसरी वनडे : कसोटी मालिकेत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने वनडे मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पुनरागमनाने संघाचा आत्मविश्वास उंचावला आणि वातावरणच बदलून गेले.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात भारताने विजयाने केली. कोहलीने शतक ठोकत धमाका केला, तर रोहितने षटकारांचा जागतिक विक्रम मोडीत काढत धडाकेबाज खेळी खेळली. मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर आता दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा टीम इंडियाचा इरादा आहे. 3 डिसेंबरला रायपुरमध्ये पुन्हा एकदा रोहित-विराट अॅक्शनमध्ये दिसतील.
30 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या मालिकेचा पहिला सामना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या गावी रांची येथे झाला. विराट कोहलीच्या शतकासह रोहित शर्माचे 57 धावा आणि कर्णधार केएल राहुलची अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर भारताने 8 बाद 349 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तर कुलदीप यादवच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका 332 धावांत ऑलआउट झाली आणि भारताने हा सामना 17 धावांनी जिंकला.
भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे कधी आणि कुठे?
रांचीचा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ आता रायपुर आणि त्यानंतर विशाखापट्टणमकडे रवाना होणार आहे. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतीमुळे बाहेर असल्याने या मालिकेसाठी केएल राहुलकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. गिल मान दुखापतीतून सावरत आहेत तर अय्यर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पोटाच्या दुखापतीनंतर पुनर्वसनात आहे.
IND vs SA वनडे मालिकेचा थेट प्रसारण कुठे पाहू?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केली जात आहे. रायपुरमधील सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. चाहत्यांना सामन्यांची लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा/हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवरही पाहता येईल.
भारतीय संघ – रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कॅप्टन, विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा,कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ – टेम्बा बावुमा (कर्ंधर), ओटनिएल बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रेत्झके, डेवाल्ड ब्रेव्हिस, नँद्रे बर्जर, क्विंटन डी कॉक, रुबिन हरमन, केशव महाराज, टोनी डी जोर्झी, रायन रिकेल्टन, मार्को जॅन्सन, एडन मार्कराम, लुंगी न्गिडी, प्रीनलान.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.