ड्रेसिंग रूममध्ये रोहित–गंभीरची गरमागरम चर्चा? व्हायरल फोटोमुळे खळबळ निर्माण

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाने 17 धावांनी शानदार विजय मिळवला. विराट कोहलीच्या (Virat Kohli’s Century) जोरदार शतकामुळे आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अर्धशतकामुळे भारताने भक्कम धावसंख्या उभारली. तर गोलंदाजीत कुलदीप यादव (Kuldeep yadav), हर्षित राणा (Harshit Rana) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep singh) यांनी मिळून सामना भारताच्या बाजूने खेचला.

पण सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर ड्रेसिंग रूममधून वायरल झालेल्या रोहित शर्मा आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्या फोटोंची जोरदार चर्चा सुरू होती.

सामना झाल्यानंतर ड्रेसिंग रूममधील काही फोटोज समोर आले, ज्यात रोहित आणि गंभीर गंभीर चेहऱ्याने एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. हे फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की दोघांमध्ये काही वाद झाला का?

पण फक्त फोटोवरून कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही. अशा प्रकारचे फोटो संपूर्ण संभाषणाचा संदर्भ दाखवत नाहीत. वायरल फोटोंवरून एवढंच दिसतं की दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती.

टॉस हरल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली आणि 8 विकेटवर 349 धावा केल्या. विराट कोहलीने आपल्या स्टाईलमध्ये 135 धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यात 11 चौकार आणि 7 षटकार होते. रोहित शर्माने जलद सुरुवात करून 57 धावा केल्या. कर्णधार केएल राहुलनेही (KL Rahul) 60 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

फलंदाजांनी मोठा स्कोर उभारल्यानंतर गोलंदाजांनीही चांगली साथ देत दक्षिण आफ्रिकेला 332 धावांवर रोखले.

Comments are closed.