हा आहे भाजपचा खरा चेहरा आणि व्होटचोरी करून निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला; व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांची टीका
राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचा पर्दाफाश महाविकास आघाडीने अनेकदा केला. दुबार नावे, चुकीचे पत्ते व फोटो तसेच बोगस मतदारांची घुसखोरी याचे पुरावेदेखील दिले. या घोळावरून विरोधकांनी रान उठवलेले असतानाच भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश बालदी यांनी ‘अनधिकृत मतदारांनी ठोकून मतदान करा’, असे म्हटले आहे. याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर करत भाजपवर हल्ला चढवला आहे.
‘अनधिकृत मतदारांनी ठोकून मतदान करा”, हे शब्द आहेत भाजपा आमदारांचे..! हा आहे भाजपचा खरा चेहरा आणि वोटचोरी करून निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला. निवडणूक आयोगाला हे दिसणार नाही, कारण निवडणूक आयोग कुंभकर्णाप्रमाणे झोपला आहे. 100 रुपयाचं बक्षीस घोषित करणारे बावनकुळे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब काही बोलणार का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
“अनधिकृत मतदारांनी ठोकून मतदान करा”, हे शब्द आहेत भाजपा आमदारांचे..! हा आहे भाजपचा खरा चेहरा आणि वोटचोरी करून निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला..
निवडणूक आयोगाला हे दिसणार नाही, कारण निवडणूक आयोग कुंभकर्णाप्रमाणे झोपला आहे…
१००० रुपयाचं बक्षीस घोषित करणारे बावनकुळे साहेब आणि… pic.twitter.com/SKIHesM9V8
– रोहित पवार (@RRPSpeaks) १ डिसेंबर २०२५
गुंडांचा बंदोबस्त करा, पोलीस अधीक्षकांना पत्र
जामखेड नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होत असून यानिमित्त शहरातील काही प्रभागात स्थानिक गुंडांकडून दहशत निर्माण केली जात आहे. गाड्या फोडणं, फ्लेक्स फाडणं, दमदाटी करणं असले प्रकार सुरु झाले असून याचा विपरित परिणाम मतदानावर होऊ शकतो. त्यामुळं निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त लावून गुंडांचा योग्य बंदोबस्त करण्यात यावा, यासाठी पोलीस अधीक्षक घारगे साहेब यांना पत्र दिले, अशी माहिती रोहित पवार यांनी एक्सद्वारे दिली.
जामखेड नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होत असून यानिमित्त शहरातील काही प्रभागात स्थानिक गुंडांकडून दहशत निर्माण केली जात आहे. गाड्या फोडणं, फ्लेक्स फाडणं, दमदाटी करणं असले प्रकार सुरु झाले असून याचा विपरित परिणाम मतदानावर होऊ शकतो. त्यामुळं निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत… pic.twitter.com/dfR7D0sXyo
– रोहित पवार (@RRPSpeaks) 30 नोव्हेंबर 2025
Comments are closed.