लालपरीचा डीजिटल कारभार रामभरोसे; MSRTC वरून तिकीट बूक करताना समस्या, प्रवाशांचे हाल

एसटी बस ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची जीवनवाहिनी झाली आहे. आपल्याला गाव, खेड्यापर्यंत पोहोचवणारी लाल परी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस. मात्र याच लालपरीचा डीजिटल कारभार रामभरोसे असल्याचे समोर आले आहे. एमएसआरटीसी या अॅपवरून तिकीट बूक करताना तांत्रिक समस्या येत असून यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने तिकीट प्रवाशांच्या सोयीसाठी MSRTC हे अॅप आणले. या अॅपवरून घरबसल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील तिकीट बूक करता येते. मात्र हे तिकीट बूक करताना सध्या सर्व्हिस अनअव्हाईलेबल (Service Unavailable) असा एरर येत आहे.
वारंवार रिफ्रेश केल्यानंतर अॅप सुरू झाले तर तिकीट बूक करताना पैसे खात्यातून कट होतात, मात्र तिकीट बूक होत नाही. सदर तिकीट फेलमध्ये जाते. फेल झालेल्या तिकीटाचे पैसे परत मिळवण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचे नाहक हाल होत आहे.

Comments are closed.