रोहित अन् गंभीर बोलत राहिले, विराट कोहली न थांबता रुममध्ये निघून गेला; हॉटेलच्या लॉबीमध्ये नेमक


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला वनडे : भारतीय क्रिकेटमध्ये वरिष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये मतभेदांचा दीर्घ इतिहास आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान भारतीय क्रिकेटमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि संघाचे दोन मोठे स्टार, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील संबंध बिघडले आहेत आणि त्याचा परिणाम एकदिवसीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्येही जाणवत आहे.

दरम्यान, भारतीय संघाने कसोटी मालिकेतील अपमानास्पद पराभव विसरून एकदिवसीय मालिकेची सुरुवात विजयाने केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 17 धावांनी मिळालेल्या या विजयाचा हिरो विराट कोहली होता. मात्र सामना संपल्यानंतर रांचीतील टीम हॉटेलमध्ये तो बाकी खेळाडूं सोबत दिसला नाहीत.

टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार केएल राहुल सहकाऱ्यांसोबत केक कापत सेलिब्रेशन करताना दिसला, तर रोहित शर्मा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत उभा राहून चर्चा करताना दिसला. पण या सर्वांमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते विराट कोहलीच्या व्हिडिओने, ज्यात तो गंभीरला पूर्णपणे इग्नोर करत थेट आपल्या रूमकडे जाताना दिसतो.

विराट कोहलीने खरंच गंभीरला इग्नोर केलं?

फेब्रुवारीनंतर प्रथमच भारतीय प्रेक्षकांसमोर विराटने वनडेमध्ये शतकी खेळी करत धमाकेदार पुनरागमन केले. जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदानावर भारताने 349 धावांचा डोंगर उभारल्यानंतर पाहुण्या संघाला 332 धावांवर रोखत 17 धावांनी सामना जिंकला. आपल्या अप्रतिम शतकामुळे विराटला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा बहुमान मिळाला.

सामना संपल्यानंतर जेव्हा विराट कोहली ड्रेसिंग रूमकडे जात होता, तेव्हा तिथे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आधीच उपस्थित होता. मात्र कोहली याने खिशातून फोन काढला आणि त्यात पाहत कोणाशीही संवाद न साधता तो सरळ पुढे निघून गेला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल होताच चर्चेला जोर आला की, विराट खरोखरच गंभीरला इग्नोर करत होता का?

हे ही वाचा –

भारत विरुद्ध सा दुसरी वनडे : जैस्वाल बाहेर, टिळक वर्मा मध्ये; रोहित-ऋतुराज सलामीवीर? दुसऱ्या वनडेत टीम इंडियाची कशी असेल प्लेइंग इलेव्हन? जाणून घ्या टीम

आणखी वाचा

Comments are closed.