जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार का केले? हेमा मालिनी यांनी सांगितले कारण…

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला एक आठवडा उलटला आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत मोठा पोकळी निर्माण झाली आहे. निधनानंतर धर्मेंद्र यांचे अंतिम संस्कार घाईघाईने करण्यात आले. तसेच त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जास्त वेळ ठेवण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेक चाहत्यांना त्यांना श्रद्धांजली वाहता आली नाही. याबाबत चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. धमेंद्र यांचे अंत्यसंस्कार लगेचच आणि घाईघाईने का करण्यात आले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जास्त वेळ का ठेवण्यात आले नाही, याबाबत त्यांच्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी माहिती दिली आहे.
धर्मेंद्र यांच्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे अनेक चाहत्यांना त्यांचे अंत्यदर्शन घेता आले नाही. आता, हेमा मालिनी यांनी याचे कारण सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, धर्मेंद्र यांना की कोणीही हतबल, खचलेले आणि आजारी पाहू नये. त्यांनी त्यांचे दुःख त्याच्या जवळच्या नातेवाईकांपासूनही लपवले. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर, अंत्यसंस्कार आणि इतर विधी याबाबत कुटुंब निर्णय घेते. त्यांच्या शेवटच्या काळात आजाराने ते त्रस्त होते. एवढ्या आजापणातही ते खचले नाहीत. त्यांचा कणखरपणा कायम होता. त्यांचा आजारपणातील काळ खूप वेदनादायक होता आणि आम्हालाही त्यांना त्या अवस्थेत पाहणे सहन होत नव्हते. आपली अशी स्थिती कोणासमोर येऊ नये, आपली हतबला कोणालाही दिसू नये, याची ते खूप काळजी घेत होते. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार घाईघाईत करण्यात आले. तसेच त्यांचे पार्थिवही जास्तवेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले नव्हते, असे त्यांनी सांगितले.

Comments are closed.