लग्न करून देतो सांगितलं, सक्षमसोबत आंचलच्या वडिलांनी डान्सही केला, मग असं काय घडलं की थेट संपवू


Nanded Crime: आंतरजातीय प्रेमसंबंधातून 19 वर्षीय सक्षम ताटेच्या (Saksham Tate) निर्घृण हत्येनं संपूर्ण नांदेड (Nanded Crime) जिल्हा हादरला आहे. प्रेयसी आंचल मामीडवार (Anchal Mamdiwar) हिच्या वडील आणि भावांनी मिळून सक्षमची हत्या केली आहे. या घटनेनंतर आंचलने सक्षमच्या मृतदेहासमोर त्याच्याशी विवाह करत आयुष्यभर त्याच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

सक्षम, आंचल आणि तिचे वडील गणेश मामीडवार हे तिघेही गेल्या वर्षीच्या भीमजयंती मिरवणुकीत एकत्र नाचताना दिसत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. तिघांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. नाचताना दिसणाऱ्या या तिघांच्या व्हिडिओवरून दोन्ही कुटुंबांतले संबंध किती चांगले होते हे दिसून येते. जे वडील सक्षमसोबत मिरवणुकीत नाचत होते, तेच त्याचा घात करतील असे कुणालाही वाटले नव्हते. तर गणेश मामीडवारने सक्षमला ‘लग्न करून देतो’ असंही सांगितल्याचं सक्षमच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.

Nanded Crime: जे कुटुंब सक्षमसोबत नाचत होते, त्यांनीच केला घात

दरम्यान, आंचलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचे दोन्ही भाऊ आणि सक्षम हे जिवलग मित्र होते. या मैत्रीतूनच सक्षमचे आंचलच्या घरी येणे-जाणे वाढले आणि तीन वर्षांपूर्वी दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही अत्यंत आनंदी होते. प्रेम प्रकरणाला घरच्यांचा विरोध असला तरी काही काळापूर्वीपर्यंत मामीडवार कुटुंबीय सक्षमशी सहजपणे वागत होते. त्यामुळेच हा खून अधिक धक्कादायक ठरत आहे. जे कुटुंब सक्षमसोबत नाचत होते, त्या कुटुंबातीलच लोकांनी त्याचा जीव घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Nanded Crime: सक्षमच्या आईची प्रतिक्रिया

या प्रकरणावर सक्षमची आई संगीता ताटे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सक्षमच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी आंचल मला पोलीस स्टेशनमध्ये भेटली. ती खूप रडत होती आणि माझ्याबरोबरच ती घरी आली. माझ्या गळ्यात पडून ती रडली आणि म्हणाली की मी तुमच्याच घरी राहीन. त्या दिवशी मी तिला माझ्या घरी घेऊन आले. जसं मी माझ्या मुलावर प्रेम केलं, तसंच प्रेम मी आंचलवरही करीन. तिला मुलगी न मानता, सक्षमप्रमाणेच माझा मुलगा मानेल. तिच्यात मला सक्षम दिसतो. मी तिच्यावर माझ्या स्वतःच्या लेकीसारखं प्रेम करेन. जोपर्यंत माझा जीव आहे, तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करत राहीन. तिने माझी साथ सोडली नाही, तर मी देखील तिची साथ आयुष्यभर सोडणार नाही. माझी एकच मागणी आहे की, माझ्या मुलाला न्याय मिळावा,” असे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

Nanded Crime: सक्षमवर गोळ्या झाडण्याच्या दोन तास आधीच…; आंचलच्या आईबाबत धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं होतं?

आणखी वाचा

Comments are closed.