Belly Fat : दोरी उड्या मारून कमी करा पोटाची चरबी
हल्ली पोट वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. एकपेक्षा एक मोठी.. अशा पोटांची स्पर्धा लागली आहे असं चित्र खूपवेळा दिसून येतं. पण, ही पोटावरची चरबी अनेक आजारांना आमंत्रण देणारी असते. शरीर आजारांच घर होऊ नये यासाठी विविध प्रयत्न केले जातात. व्यायामापासून ते अगदी डाएट फॉलो केले जातात. अशातचा तुम्हाला आज आम्ही सर्वात सोपा असा व्यायाम सांगणार आहोत. ज्याच्या सरावाने पोटावरची चरबी नक्कीच कमी होऊ शकते. हा व्यायामप्रकार म्हणजे ‘दोरी उड्या’. दोरी उड्या मारून संपूर्ण शरीराचा उत्तम व्यायाम होतो. शारीरिक व्यायामात दोरी उड्या मारणे हे अत्यंत उत्तम मानले जाते. लहानपणी शाळेत सर्वांना दोरी उड्या मारण्याचा व्यायाम प्रकार असायचा. हाच व्यायाम तुम्हाला आताही करायचा आहे.
पोटाची चरबी कमी होते का?
दोरी उड्या मारल्याने जलद गतीने कॅलरी बर्न होते. पोटावरील चरबी बर्न करण्यासाठी हा सर्वात सोपा व्यायाम आहे. या व्यायामाच्या सरावाने शरीरातील मांसपेशी अधिक मजबूत होतात. जर तुम्ही 15 मिनिटे दोरीच्या उड्या मारल्यात तर 300 कॅलरी बर्न होऊ शकतात. त्यामुळे हा व्यायाम नियमित केल्यास काही प्रमाणात पोटाची चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
हेही वाचा – Yoga : योगा करताना कसा असावा आहार?
इतर फायदे –
पोटाची चरबी कमी होण्यासह दोरीच्या उड्या मारल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते आणि स्नायू मजबूत होतात. ताणही कमी होतो. एका अभ्यासानुसार ज्या व्यक्तींनी सहा आठवडे रोज दोरी उड्या मारण्याचा व्यायाम 10 मिनिट्स केला त्यांना हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
दोरी उड्या मारणे हे मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. तुमच्या शरीराला आणि मेंदूला ऊर्जा देण्यासाठी दोरी उड्या उत्तम पर्याय आहे. शारीरिक व्यायामासह एकाग्रता वाढवायची असल्यास दोरी उड्या नक्की माराव्यात.
व्यायामाचा कंटाळा असेल तर दोरी उड्या मारण्याचा व्यायाम उत्तम आहे. यामुळे शरीर अधिक लवचिक होते आणि चपळता वाढते.
दोरीच्या उड्या हा अन्य व्यायामापेक्षा मजेशीर व्यायाम आहे. शरीराचे संतुलन साधण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. पण, यात सातत्य असणे आवश्यक आहे. तुम्ही दोरीच्या उड्या मारण्यात सातत्य ठेवलेत तर नक्कीच तुम्हाला वेट लॉस अनेक फायदे होऊ शकतात.
हेही वाचा – Breakfast Routine: ब्रेकफास्ट करण्याची योग्य वेळ कोणती? नाश्ता करताना टाळा ‘या’ चुका
Comments are closed.