काही तरी बिनसलंय? विजयाचं सेलिब्रिशेन टाळून विराट कोहली एका बाजूने निघून गेला… Video आला समोर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत दारून पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने वनडे मालिकेची दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्याच वनडे सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकलं तर रोहित शर्माने अर्धशतकीय खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. केएल राहुलच्या नेतृत्वात संघाने विजयी आघाडी घेतली. सामना संपल्यानंतर जेव्हा संघ हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी केक कापण्यात आला. मात्र, यावेळी केएल राहुल केक कापत असताना विराट कोहली न थांबता एका बाजून पुढे निघून गेला. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधान आलं आहे.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याच झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने 120 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 7 षटकार ठोकत 135 धावांची जबरदस्त खेळी केली. तसेच रोहित शर्माने सुद्धा सलामीला येत 57 धावांची सलामी दिली. मधल्या फळीत कर्णधार केएल राहुलने 60 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाने द.आफ्रिकेला जिंकण्यासाठी 349 धावा करत 350 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 332 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आलं आणि टीम इंडियाने 17 धावांनी सामना जिंकला. कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर हर्षित राणाने 3, अर्शदिप सिंगने 2 आणि प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट घेतली. आता टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना बुधवारी (3 डिसेंबर 2025) खेळला जाणार आहे.

Comments are closed.